समाजात असलेला विज्ञानदृष्टीचा अभाव दूर करण्यासाठी आणि शालेय विद्यार्थ्यांच्या विज्ञान विषयक आकलनात मदत करण्याच्या हेतूने विज्ञान शिक्षण आणि संप्रेषण केंद्र (Center for Science Education and Communication, SPPU) आणि ग्रंथाली विज्ञानधारा यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान एकांकिका स्पर्धा राष्ट्रीय विज्ञान दिन २८ फेब्रुवारी २०२५–२६ याचे औचित्य साधून आयोजित केली आहे.
ही स्पर्धा ग्रंथाली आयोजित राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धेचा भाग आहे. समाजात विज्ञानमूल्ये रुजवण्यासाठी विज्ञान एकांकिकांची ही स्पर्धा म्हणजे एका वेगळ्या दिशेने केलेला प्रयत्न आहे. शिक्षक–विद्यार्थी संवाद हा या एकांकिकांचा गाभा आहे. या संवादांमधून विज्ञानाचे विविध पैलू वाचकांसमोर उलगडत जावेत अशी अपेक्षा आहे.
त्यासाठी महाराष्ट्रात विविध ठिकाणी विज्ञान एकांकिका स्पर्धा घेण्यात याव्यात अशी एक कल्पना आहे. या स्पर्धेसाठी पद्मश्री डॉ. शरद काळे, #BARC #Scientist लिखीत ७० एकांकिकांपैकीच एक एकांकिका निवडावी.
प्रथम तीन विजेत्यांना रोख रक्कम रुपये ५०००/-, ३०००/- आणि २०००/- अशी अनुक्रमे देण्यात येईल.
शाळा प्रमुख, शिक्षक तसेच पालकांना आव्हान करीत आहोत की विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे.